हायलाइट्स:

  • २ अल्पवयीन बहिणींवर सतत सुरू होते बलात्कार
  • नवी मुंबईतून जालन्यात पोहचल्या अन्…
  • ०१ ऑक्टोबर रोजी या दोघी नराधमाच्या तावडीतून पळाल्या

जालना : जालना शहराजवळील निधोना येथील अविनाश काकासाहेब जोगदंड या १८ वर्षीय नराधमाने नवी मुंबईतील दिघा येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींना नोकरीचे आमिष दाखवून, थापा मारून गेल्या महिन्याभरापासून जालन्यात आणलेले होते. या दोघींना जालना शहरात एका भाड्याच्या घरात ठेवले होते. इतकंच नाहीतर तर या नराधमाने त्याच्या तिघा मित्रांसह दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अधिक माहितीनुसार, महिन्याभरात या दोन अल्पवयीन मुलीवर अविनाश जोगदंड, त्याचा भाऊ शुभम जोगदंड, दीपक राणा आणि गणेश काकडे अशा चौघांनी सतत बलात्कार केला. मात्र ०१ ऑक्टोबर रोजी या दोघी या त्याच्या तावडीतून सुटका करून औरंगाबादला पळून गेल्या. त्यानंतर औरंगाबादच्या सिडको पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून काल रात्री हा गुन्हा जालना पोलिसांकडे वर्ग केला.
मोठा दिलासा! करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाही: BMC
पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्यासह कदीम जालना पोलीस, पिंक पथक यांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन करून या अत्याचार प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली. तर मुख्य सूत्रधार अविनाश जोगदंड हा नांदेडहून जालन्याकडे रेल्वेने येत असल्याची माहिती मिळताच पहाटे जालना रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्यालाही अटक करण्यात आली.

यातील आरोपी गणेश काकडे आणि शुभम जोगदंड या दोघांना जालना शहरातील वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे. कदिम जालना पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.

‘यूपीत इतकं मोठं मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुखच्या मुलाच्या बातम्यांचा पाठलाग करतोय’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here