जीनिव्हा: जागितक पातळीवर भारतासह अन्य देशांनी विकसित केलेल्या करोना लशीच्या परिणामकतेवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोवॅक्सिन लशीला आपत्कालीन मंजुरी देण्याबाबत चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ एक्सपर्ट ऑन इम्यूनायझेशनकडून (SAGE) कोवॅक्सिनच्या डेटाचे विश्लेषण करण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत फायजर-बायोएनटेक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनका, मॉडर्ना, सिनोफार्म आणि सिनोवॅक लशीचा समावेश आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला मंजुरी मिळाल्यास ही पहिली भारतीय लस ठरणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी मिळणार? WHO ने दिली ‘ही’ माहिती
जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटले होते?

‘कोव्हॅक्सिन’बाबत सादर करण्यात आलेल्या माहिती अभ्यासास ६ जुलैला सुरुवात झाली आहे. या माहितीचे विश्लेषण केल्याने लशीचा आढावा घेणे शक्य होणार आहे. ही प्रक्रिया गतिमान करण्यात येत आहे. आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याची प्रक्रिया गोपनीय असते, असेही आरोग्य संघटनेने म्हटले होते. संघटनेने निर्धारित केलेले निकष एखादी लस पूर्ण करीत असल्यास त्या संदर्भातील माहिती व्यापकरीत्या प्रसिद्ध केली जाते, असेही संघटनेने म्हटले होते.

अमेरिका: करोनाबळींची संख्या सात लाखांवर; मागील तीन महिन्यातील आकडेवारी धक्कादायक!
भारत बायोटेकने काय म्हटले?

लशीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळण्याबाबतची सर्व माहिती आम्ही सादर केली आहे. आरोग्य संघटनेने उपस्थित केलेल्या शंकांचीही उत्तरे आम्ही दिली आहेत, आता त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे ट्वीट ‘भारत बायोटेक’च्या वतीने काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here