शकीर हा पुलवामातील काकापोरा येथील हाजीबालचा राहाणारा आहे. फर्निचर शॉपचा मालक असलेल्या शकीरने पुलवामा हल्ल्यातील ‘सुसाइड बॉम्बर’ आदिल अहमद दार याला आपल्या घरात आश्रय दिला होता. तसेच आयईडी बनवण्यातही मदत केली होती.
एनआयएने या कारवाईबाबत तपशील जारी केला आहे. शकीरचा पुलवामा हल्ल्यात सक्रिय सहभाग होता. हा आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमद दारला सर्वप्रकारची मदत शकीरने केली होती. शकीरच्या अटकेने या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती येण्याची शक्यता आहे. आदिल आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूख या दोघांना पुलवामा हल्ल्याच्या आधी २०१८ पासून आपल्या घरात आश्रय दिल्याची कबुली शकीरने दिली आहे. शकीरला न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. आयईडी स्फोटात ४० जवान शहीद झाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times