टोकियो: जपानची राजकुमारी माको हिने कोट्यवधींच्या संपत्तीवर पाणी सोडले आहे. माको हिने आपल्या प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. माको हिचा प्रियकर हा राजघराण्यातील नसून एक सामान्य नागरिक आहे. एका बाजूला प्रेम संबंधांमधील कटिबद्धता कमी होत असताना दुसरीकडे जपानच्या राजकुमारीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुकही होत आहे.

जपानची राजकुमारी माको (२९ वर्ष) ही सध्याचे जपानचे राजे नारुहितो यांचे बंधू राजकुमार आकिशिनो यांची मुलगी आहे. राजकुमारी माकोने प्रियकर कोमुरो याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर दोघेही अमेरिकेतच स्थायिक होणार आहेत. या विवाहाबाबत मात्र, राजघराण्याकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. राजघराण्याबाहेर लग्न करणार म्हणून राजकुमारी माको हिला शाही कुटुंबाकडून जवळपास ९.१० कोटी रुपयेदेखील देण्यात येणार होते. मात्र, माकोने ही रक्कम घेण्यास नकार दिला.

करोना लस घेण्यास नकार; १४०० कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढले
राजकुमारी माको आणि तिचा प्रियकर कोमुरो हे दोघेही अमेरिकेत कायद्याचे शिक्षण घेत आहेत. कोमुरो याला स्किईंग, व्हायलिन संगीत आणि पाककलेचा छंद आहे. त्याशिवाय समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन वाढवण्यासाठी ‘प्रिन्स ऑफ सी’ म्हणून कोमुरो काम करत आहे.

जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा आहेत तरी कोण?
केई कोमुरो याने राजकुमारी माको हिला डिसेंबर २०१३ मध्ये प्रेमाची कबुली देत लग्नाची मागणी घातली होती. या दोघांनीही आपले प्रेमसंबंध अनेक वर्ष लपवून ठेवले होते. वर्ष २०१७ मध्ये माको हिने नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विवाह २०२० पर्यंत स्थगित करत असल्याची घोषणा केली. राजकुमारी माको हिने केई कोमुरो याच्यासोबत लग्न करण्यासाठी लग्नाचे सात प्रस्ताव फेटाळले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here