जळगाव: राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. याची परिचिती आपल्याला वारंवार पाह्यला मिळते. त्याला महाराष्ट्राचं राजकारणही अपवाद नाही, हे राष्ट्रवादीच्या खासदार यांनी आज दाखवून दिलं. सुप्रिया सुळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि खासदार या आपल्या आवडत्या खासदार असल्याचं सांगतानाच रक्षा खडसे यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. निमित्त होतं, जळगावातील एका महाविद्यालयातील परिसंवादाचं.

जळगावातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचाने ‘उड्डान : संजीवनी नव-उद्योजकांसाठी’ या परिसंवादात संबोधित करताना सुप्रिया सुळे यांनी रक्षा खडसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी त्यांना दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या ४८ खासदारांपैकी तुमचे आवडते खासदार कोण? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर क्षणाचाही विचार न करता भाजप खासदार रक्षा खडसे असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर रक्षा खडसेच का आवडत्या खासदार आहेत, याची कारणमिमांसाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातील ४८ खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या महिला खासदार आहेत. धडपड करणारे नेतृत्त्व म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं, असं त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्याकडून आलेल्या अनपेक्षित उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी विद्यार्थींनींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनण्याचा कानमंत्र दिला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here