हायलाइट्स:
- गांधीनगर महापालिका निवडणूक निकाल जाहीर
- ४४ पैंकी ४० जागांवर भाजपची सरशी
- काँग्रेसला तीन जागांवर विजय तर ‘आप’ला केवळ एक जागा
गांधीनगर महापालिका निवडणुकीतील एकूण ४४ जागांवर मतमोजणी पूर्ण झालीय. ४४ पैंकी ४० जागांवर भाजपनं झेंडा फडकावल्याचं दिसून येतंय. काँग्रेसला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आलाय. तर आम आदमी पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय.
गांधीनगरमध्ये एकूण ११ वॉर्डमधील एकूण ४४ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसनं सर्वच्या सर्व अर्थात ४४ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर ‘आप’नं ४० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे ही लढत त्रिकोणी होणार असल्याचं दिसून येत होतं. मात्र, भाजपनं या निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’ला चांगलाच दणका दिलाय.
यापूर्वी सूरत महानगरपालिका निवडणुकीत आपची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. २७ जागांवर विजय मिळवत ‘आप’नं प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारत काँग्रेसला झटका दिला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times