हायलाइट्स:

  • ‘झेडपी’ च्या १४ ते पंचायत समितीच्या २८ जागासांठी मतदान
  • उद्या होणार मतमोजणी
  • अन्य १७ प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे करू शकता मतदान

अकोला: अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पड़त आहे. एकूण ४२ जागांसाठी १८७ उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषद १४ आणि पंचायत समितीच्या २८ जागांचा समावेश आहे. सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस व प्रहार जनशक्तीपक्ष स्वबळावर लढत असून महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढत आहे.

अकोला जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद निवडणुक विभाग व २८ पंचायत समिती गणात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासनानं सर्व सज्जता केली असून या निवडणूकीत तीन लाख ७१ हजार ६९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यातं १ लाख ७७ हजार ६७५ महिला तर १ लाख ९४ हजार ०१३ पुरुषसह इतर २ जण मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. असे एकत्रित ४२ जागांसाठी १८७ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस व प्रहार जनशक्तीपक्ष स्वबळावर घडत असून, महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे.

जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिति निवडणुका पार पडले. मात्र, ओबीसीच्या आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयानं ४ मार्च रोजी ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे स्पष्ट केल्यानं त्या जागाच रिक्त झाले होते. त्यामुळे २२ जून रोजी पोट निवडणुकीचा निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, ९ जुलै रोजी निवडणूक प्रक्रियेला कोविडमुळे स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आज यासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे..

‘या’ जागांसाठी मतदान!

जिल्हा परिषद गट – दानापूर, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगाव, दगडपारवा, शिर्ला, अडगाव बु., तळेगाव बु.. अकोलखेड, कुटासा, लाखपुरी.

पंचायत समिती गण – कुरणखेड, चिखलगांव, निमकर्दा, पारस भाग १ देगाव, वाडेगाव भाग २. दगडपारवा, मोहळ, महान, पुनोती बु., शिलां, खानापूर, आलेगाव, हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, पिंप्री खुर्द, अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपुरी, ब्रह्मी खुर्द, माना, कानडी, दहिहांडा, घुसर व पळसो.

488 मतदान केंद्रे

जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४८८ मतदान केंद्र व तालुकास्तरावर मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आज ५ ऑक्टोंबर रोजी मतदान व उद्या बुधवार ६ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात – ७७, अकोट तालुक्यात-८१ मुर्तिजापूर – ८३, अकोला – ८५, बाळापूर – ७४, बार्शिटाकळी – ४९ आणि पातूर तालुक्यात ३९ असे एकत्रित ४८८ मतदान केंद्र आहे.

मोदी सरकारची नियत दिसली! यूपीतील परिस्थितीची पवारांनी केली जालियनवाला हत्याकांडाशी तुलना

अन्य १७ प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे करू शकता मतदान

सुरु असलेल्या निवडणुकीत मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १७ प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे मतदान करता येणार आहे. यामध्ये पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दिलेले फोटो ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँक, अथवा टपाल पासबुक, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांने अनुसूचित जाती, अनु. जमाती, इमाव, भटक्या जमाती, वि.मा. प्र इ. ना फोटो सहित दिलेले प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला आदींचा समावेश आहे.

सुट्टी जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीत मतदारांना मतदान करता यावं, यासाठी संबंधित मतदान क्षेत्रात स्थानिक सुट्टीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कामगार अधिकारी, कर्मचारी, तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मंगळवारी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात आली आहे. कामगारांना मतदान करता यावे यासाठी दोन तासाची सवलत सर्व खासगी संस्था, व्यापारी संस्था, दुकाने व कारखानदारांनी द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते.

सोबतचं निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असून जिल्ह्यातील ज्या गावातील निवडणूक क्षेत्रात मतदानाचे दिवशी मंगळवार व मतमोजीणीच्या दिवशी दोन दिवस आठवडी बाजार बंद राहणार आहे. तर मतदानाच्या एक दिवस आधीपासूनच मतदानाच्या दिवशी व उद्या मोजणीच्या दिवशी अर्थात ६ ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मित्रांसोबत पोहायला गेले होते, घरी परतलेच नाहीत; नंतर कळलं की…

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here