हायलाइट्स:
- कोल्हापूरकरांनो सावधान!
- मुसळधार पावसामुळे तुमचं आरोग्य धोक्यात
- कोल्हापूरात जोरदार पाऊस पडल्याने जयंती नाला ओव्हर फ्लो
शहरातील मध्यभागातून जयंती नाला वाहतो. शहरातील ८० टक्के सांडपाणी जयंती नाल्यात येते. कसबा बावडा रोडवर जयंती नाल्यावर दगडी पूल असून सांडपाणी नदीत जाऊ नये म्हणून नाल्यावर महानगरपालिकेने बंधारा बांधला आहे. बंधाऱ्यात आडवलेले सांडपाणी कसबा बावडा येथील एसटीपीमध्ये नेण्यात येते.
तिथे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. पण काल सोमवारी शहरात जोरदार पाऊस झाला असून जयंती नाला ओव्हर फ्लो झाला आहे. जयंती नाल्यावर दोन उपसा पंप असून त्याद्वारे पाणी उपसा करुन एसटीपी पाठवण्यात आहे. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने जयंती नाल्यातून सांडपाणी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचगंगा नदीत मिसळत आहे.
सांडपाणी मिसळल्याने पंचगंगेचे पाणी प्रदुषित होत असून नदीकाठच्या हातकणंगले, शिरोळ तालुक्यात पिण्यासाठी पंचगंगा नदीतून उपसा केला जातो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times