मुंबई: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील पहिला कॅप्टन होण्याचा मान स्पर्धत उत्कर्ष शिंदेला मिळाला. कॅप्टन होण्यासोबतच तो दिलेल्या टास्कचा संचालकही होता. दोन गटात हा टास्क खेळण्यात आला होता. संचालकानं त्यची जबाबदारी निपक्षपणे पार पाडावी असं अपेक्षीत होतं. मात्र, त्यानं त्याच्या टीमची बाजू घेत त्यांच्या बाजूनंच निर्णय दिल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी भरणाऱ्या बिग बॉसच्या चावडीवरही महेश मांजरेकरांनी प्रेक्षकांची मतं आणि भावना स्पर्धकांपर्यंत पोहोचवल्या.

बिग बॉसच्या चावडीनंतर उत्कर्षचा भाऊ म्हणजेच गायक आदर्श शिंदेनं नाराजी व्यक्त करत चावडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिग बॉसची चावडीच डबल ढोलकी असल्याचं त्यानं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.आदर्शनं पोस्ट करत स्वतःची आणि इतर काही प्रेक्षकांची मतं मांडली आहेत. नेटकऱ्यांनी आदर्शच्या या पोस्टवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी त्याला प्रचंड ट्रोलही केलं आहे. बिग बॉसमध्ये जे झालं ते सर्वांनीच पाहिलं, भाऊ म्हणून तुम्ही त्याची बाजू घेऊ शकत नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. बिग बॉसच्या चावडीवर मांजरेकर म्हणाले ते प्रेक्षकांच्याही मनात होतं, असं ही अनेकांनी म्हटलं आहे.

पोस्ट

पोस्ट 2

काय घडलं होतं नेमकं टास्कदरम्यान?
घरात गेल्या आठवड्यात हल्लाबोल हा टास्क घेण्यात आला. या टास्कदरम्यान कॅप्टन आणि संचालक असलेल्या उत्कर्षने एकाच गटाकडून निर्णय घेत वारंवार पक्षपात केल्याचं निदर्शनास आलं. हल्लाबोल टास्कदरम्यान जय आणि गायत्री यांनी मिरचीच्या धुरीचा वापर केला. परंतु, दुसऱ्या गटाला मिठाचं पाणी वापरण्यासही उत्कर्षने मनाई केली होती. त्यावरून मांजरेकरांनी उत्कर्षवर निशाणा साधला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here