हायलाइट्स:
- एनसीबीने ११ ऑक्टोबरपर्यंत मागितली होती आरोपींची कोठडी
- ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी करणार आर्यनसह इतरांची चौकशी
- आलिशान महालात राहणारा आर्यन राहतोय एनसीबी कोठडीत
फार फार तर दोन तास झोपतात समीर वानखेडे- क्रांती रेडकर
क्रूजवर एनसीबीने कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्या सगळ्यांची रवानगी सध्या एनसीबी कार्यालयात करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस सगळ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. एनसीबीला आर्यनच्या फोनमध्ये अमली पदार्थांशी संबंधित काही चॅट आढळून आल्याने आर्यनच्या अडचणी वाढल्या आहेत. लाडाकोडात वाढलेला अन फाइव्ह स्टारमध्ये जेवणारा शाहरुखचा मुलगा सध्या सामान्य माणसाचं जीवन जगत आहे.

आर्यनला एनसीबी कार्यालयात डाळ, भात, पराठा, पुरी- भाजी असे पदार्थ जेवणासाठी दिले जातात. परंतु, हे पदार्थ कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवले जात नाहीयेत तर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका भोजनालयातून मागवले जातात. यासोबतच आर्यनला बिर्याणी देखील दिली जातेय जी जवळच्या एका रेस्टोरन्ट मधून आणली जाते.
‘या’ छोट्याशा कारणामुळे आर्यन खानवर NCB ला आली शंका
आर्यनवरील अमली पदार्थांचं सेवन केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. आर्यनला कमीत कमी १ वर्ष तुरुंगवास आणि १० हजार भरण्याची शिक्षा होऊ शकते. परंतु, अमली पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याचं आढळलं तर मात्र या शिक्षेत १० पटीने वाढ होऊ शकते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times