हायलाइट्स:

  • आर्यनसह इतर आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
  • एनसीबीने मागितला चौकशीसाठी वेळ
  • आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडे एनसीबीचा इशारा

मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने केलेल्या मागणीनुसार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांना ७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्वांवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप एनसीबीने केला असून त्यांच्या व्हॉट्सअप चॅटमधून अनेक खळबळजनक खुलासे झाल्याचेही एनसीबीने म्हटले आहे. या प्रकरणाच्या चौकशीला आता सुरुवात झाली आहे.

बाबा बिझी असतात, भेटायला अपॉइंटमेन्ट घ्यावी लागते- आर्यन

ड्रग्ज पुरवठादार आणि ग्राहकांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करायचा असल्याने सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे, असा दावा एनसीबीने सुनावणीदरम्यान केला. आर्यनच्या चॅटमधून अनेक आश्चर्यचकित करणारी माहिती हाती आली आहे. आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांचे व्हॉट्सएप चॅट आंतराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडे इशारा करत आहेत, असा दावासुद्धा एनसीबीने न्यायालयात केला.

आर्यन खान

चॅटमध्ये आर्यन ड्रग्जसाठी पेमेंट केल्याचे सांगत आहे. त्यामध्ये तो कोडवर्डचा वापर करत आहे. सर्व आरोपींच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची गरज आहे. याप्रकरणी जुहूच्या एका ड्रग्ज पुरवठादाराला अटक केली असून, त्याच्याकडूनही ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत, असे एनसीबीने न्यायालयात सांगितले.

फाइव्ह स्टारमध्ये जेवणारा आर्यन आता खातोय डाळ- भात

आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे एनसीबीच्या आरोपांवर बचाव करताना म्हणाले की, ‘आर्यनची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसेच आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज आढळून आले नाही. एनसीबीच्या छाप्यादरम्यान त्याने पळण्याचाही प्रयत्न केला नाही. आर्यनला क्रूझवर अरबाजसोबत आमंत्रित करण्यात आले होते. या पार्टीत सहभागी होण्यासाठी त्याने पैसेही दिलेले नाहीत. अरबाजकडे आढळलेल्या ६ ग्रॅम चरसचा आर्यनशी काहीही संबंध नाही.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here