हायलाइट्स:
- या फोटोतल्या झाडाची किंमत आहे तब्बल १०० कोटी
- या झाडाच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांसह वनविभाग देखील २४ तास अलर्ट
- वाचा काय आहे वैशिष्टे
या झाडाची किंमत आहे तब्बल १०० कोटीच्या घरात. होय. हा तोच आकडा ज्यानं राज्याचं राजकारण ढवळून काढलं. याच आकड्यामुळे अनेक उलथापालथी देखील झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या देवराईमध्ये तब्बल १५० वर्षापेक्षा देखील जास्त जुनं असं हे रक्तचंदनाचं झाडं आहे. विशेषता कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्याच्या काही विशिष्ट भागातच हे झाड आढळून येतं. असं असताना कोकणच्या जंगलात हे झाड कसं आलं याचं उत्तर मात्र अद्याप कुणालाही सापडलेलं नाही.
मुख्यबाब म्हणजे याच झाडाच्या सुरक्षेसाठी गावकरी आणि वनविभाग देखील २४ तास अलर्ट असतं. हे झाड चोरण्याचं प्रयत्न देखील झाला होता अशी चर्चा देखील दबक्या आवाजात का असेना आपणाला आसपासच्या परिसरात ऐकू येते. पण, प्लॅन फसला आणि सारे मनसुबे उधळले गेले. त्यामुळे अतिदुर्मिळ आणि कोकणाच्या जंगलात असलेल्या या झाडाची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची.
रक्त चंदनाचं महत्त्व तुम्ही सर्वजण जाणता. आज बाजारामध्ये जवळपास ५ ते सहा हजार रूपये किलो दरानं याची विक्री होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील याला मोठी मागणी आहे, शिवाय आता हे सारं ऐकल्यानंतर तुम्हाला याची किंमत १०० कोटी कशी? असा प्रश्न साहजिकच पडला असले. त्याबाबत देखील उत्सुकता आहेच. खरंतर, या झाडाचं खोड १७ ते १८ फूट खोल असल्यामुळे आताच्या भावाने याची किंमत १०० कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुळात ही सारी गोष्ट तशी अविश्वसनीय. पण, कोकणच्या जंगलात, देवराईत तब्बल १५० वर्षापेक्षा देखील जास्त काळ हे झाड सुरक्षित आहे. मुख्य बाब म्हणजे स्थानिकांचं देखील याच्या सुरक्षेसाठी जातीनं लक्ष आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times