china taiwan tension: आमच्यावर ताबा मिळवल्यास आशियाचा विनाश होईल ; चीनला ‘या’ देशाचा इशारा – taiwan president warns china of ‘catastrophic consequences’ if island falls
ताईपाई: चीनकडून आक्रमक विस्तारवादी भूमिका घेतली जात असल्याने आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चीन आणि तैवानमधील तणाव वाढला आहे. मागील काही दिवसांमध्ये चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली असल्याचे समोर आले. एक ऑक्टोबर रोजी चीनने राष्ट्रीय दिवस साजरा करताना लष्करी शक्तिप्रदर्शन केले. चिनी हवाई दलाने तैवानच्या हद्दीत ३८ लढाऊ विमाने घुसवली. या प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटू लागले आहेत.
चिनी हवाई दलाने केलेल्या या घुसखोरीवर तैवानचे राष्ट्रपती साई इंग-वेन यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, चीनने तैवानचा ताबा घेतल्यास याचे गंभीर परिणाम होतील. आशिया खंडात याचे गंभीर आणि विनाशकारी प्रतिक्रिया दिसून येईल असे त्यांनी म्हटले. एका परराष्ट्र धोरणाविषयक नियतकालिकेत त्यांनी एक लेख लिहिला आहे. त्यांनी लेखात म्हटले की, तैवानला युद्ध नको आहे. मात्र, स्वसंरक्षणासाठी सर्व मार्ग वापरण्यास तैवान सज्ज आहे. चीनकडून तैवानवर सातत्याने दबाव टाकला जात आहे. तैवान स्वत:ला एक स्वतंत्र देश म्हणून जगाला ओळख करून देतो. तर, चीनकडून हा आमचाच भूभाग असल्याचा दावा करण्यात येतो. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीदेखील तैवान हा लवकरच चीनचा भूभाग होईल, असे म्हटले होते.
चीनकडून पूर्व लडाख सीमेवर जुळवाजुळव सुरूच; लष्करी तळ बळकट करण्यावर भर वर्ष २०१६ मध्ये तैवानमध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीनंतर चीनने या भागावर सैन्य, राजनयिक आणि आर्थिक दबाव वाढवला. या निवडणुकीत इंग-वेन यांनी विजय मिळवला होता. स्वतंत्र तैवानची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे. तैवान हा स्वतंत्र देश असून चीनचा भाग नसल्याचे त्यांनी अनेकदा म्हटले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times