– पं. डॉ. संदीप अवचट

मेष : अकारण चिंता केल्याने विचारशक्ती खुंटेल. आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याआधी जागे व्हा. सकारात्मकता ठेवा व त्यानुसार निर्णय घ्या.

वृषभ : व्यावसायिकांची भांडवलाची चिंता मिटेल. स्वास्थ्य जपा. आप्तेष्टांशी आर्थिक व्यवहार करताना दक्षता बाळगा.

मिथुन : मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची दाट शक्यता. कौटुंबिक समारंभामुळे मानसिक स्थैर्य लाभेल. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल.

कर्क : खळखळून हसण्याचे विविध फायदे मिळतील. मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. प्रेमळ आप्तेष्ट लाभल्यामुळे धन्यता वाटेल.

सिंह : अडचणींचा सामना करण्याचा दिवस. अपेक्षित मदत मिळणे दुरापास्त होईल. निर्णयांची अंमलबजावणी घाईने करणे घातक ठरू शकते.

कन्या : आयुष्यात नेहमी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. स्वप्ने साकार होण्यास सुरुवात होईल. मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते.

तुळ : धन बचतीच्या नवीन धोरणांचा अवलंब करा. आरामदायी दिवस. परिवारातील इतर सदस्यांबरोबर मनोरंजन करण्याकडे कल राहील.

वृश्चिक : कौटुंबिक गरजा पूर्ण कराल. फावल्या वेळेत जनहितार्थ कामे कराल. नवीन चित्रपट अथवा नाटक पाहावेसे वाटेल.

धनु : मित्राच्या मदतीला धावून जाल. आर्थिक दृष्ट्याही मदत करावी लागेल. विवाहेच्छुंची लग्नविषयक बोलणी यशस्वी होईल.

मकर : चांगले विचार आयुष्यातील समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे असतात. अनेक मार्गाने आर्थिक लाभ होत राहील. जोडीदाराशी वाद होतील.

कुंभ : जुन्या मित्रांसमवेत मौजमजा कराल. कार्यलयीन कामे वेळेच्या आधी पूर्ण कराल. स्वत:साठी पर्याप्त वेळ काढाल.

मीन : मानसिक ताण घालविण्यासाठी योगसाधना कराल. वस्तुस्थिती बदलता येत नसेल, तर ती मान्य करण्यातच शहाणपणा आहे. जीवनसाथीची भक्कम साथ लाभेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here