हायलाइट्स:

  • आर्यन खान आणि अरबाज मर्चंटची होऊ शकते निर्दोष मुक्तता
  • अरबाजच्या वडिलांनी व्यक्त केली संभावना
  • एनसीबीच्या वागणुकीसाठी मानले आभार

मुंबई– बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली आहे. मुंबईहून गोव्याला जाण्याऱ्या क्रुजमध्ये अमली पदार्थांचं सेवन केल्या प्रकरणी आर्यनसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मैत्रीण मुनमुन धामेचा यांना अटक करण्यात आली. शनिवारी आर्यनसह आठ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने आर्यन आणि इतरांना तीन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे. परंतु, या दरम्यानची एनसीबीची मुलांसोबतची वागणूक अतिशय चांगली असल्याचा खुलासा अरबाजचे वडील अस्लम मर्चंट यांनी केला आहे.

Aryan Khan Case : शाहरुख खानला हंसल मेहतांचा पाठींबा

आर्यनचा मित्र असलेल्या अरबाजचे वडील वकील आहेत. याप्रकरणात मुलांवर लावलेले सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अस्लम यांनी एनसीबी अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी मुलांना अतिशय चांगली वागणूक दिली आहे असा खुलासा अस्लम यांनी केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अस्लम म्हणाले, ‘सध्या या प्रकरणावर फार बोलणं योग्य ठरणार नाही पण एक वकील म्हणून सांगू शकतो एनसीबी अधिकाऱ्यांची मुलांसोबतची वागणूक अत्यंत चांगली होती. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सत्य लवकरच सगळ्यांसमोर येईलच आणि ते सगळे निर्दोष ठरतील.’

आर्यन खान

अरबाजबद्दल सांगताना अस्लम म्हणाले, ‘अरबाज आणि आर्यन यांचा क्रूजवर जाण्याचं ठरलं नव्हतं. त्याने माझ्याकडे क्रूजवर जाण्यासाठी परवानगी देखील मागितली होती. त्यांचं अचानक ठरलं. यापूर्वी ते दोघे अशा पार्टीला कधीही गेले नव्हते.’ अरबाजच्या वडिलांनी एनसीबी अधिकाऱ्यांचं कौतुक करत मुलांची निर्दोष मुक्तता होणार असल्याचं म्हटलं.

फार फार तर दोन तास झोपतात समीर वानखेडे- क्रांती रेडकर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here