परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातून वाहणाऱ्या वाण नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या एका बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेख रेहान शेख आलीम (१२) असं मृत बालकाचं नाव आहे.

शहरातील वडकर गल्ली भागात राहणारा शेख रेहान शेख आलीम हा आपल्या मित्रांसोबत दुपारी वाण नदीच्या पात्रात पोहायला गेला होता. मात्र नदी पात्रात सकाळपासून पाणी वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. नदीकाठी कपडे धुणाऱ्या काही महिलांनी मुलगा वाहून जात असल्याचं पाहून मदतीसाठी परिसरातील नागरिकांना बोलावले.

कोल्हापुरात खळबळ! हळदकुंकू लावलेल्या अवस्थेत आढळला बालकाचा मृतदेह

मुलगा वाहून गेल्याचं समजताच परिसरातील तरुणांनी त्याचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरून प्रयत्न केले. तब्बल एक ते दीड तासानंतर रेहानचा मृतदेह हा नदीपात्रातील एका बाभळीच्या बनात सापडला.

मृत बालकाचे सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे देण्यात आला.

दरम्यान, १२ वर्षीय मुलगा गमावल्याने शेख कुटुंबाने मोठा आक्रोश केला. वडकरी गल्ली परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here