हायलाइट्स:

  • महिलेला गुंगीचे औषध पाजून युवकाने नग्न फोटो काढले
  • नग्न फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत वारंवार बलात्कार
  • पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा

यवतमाळ : एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून युवकाने नग्न फोटो काढले आणि ते फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत वारंवार त्या महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. ही धक्कादायक घटना अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी उघडकीस आली. याबाबत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विशाल शेंडे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेसोबत २०११ मध्ये विशाल शेंडे याची ओळख झाली होती. त्यानंतर सन २०१३ मध्ये विशालने विवाहित महिलेला घरी बोलावून तिला चहामध्ये गुंगीचं औषध पाजलं. यावेळी ती बेशुद्ध झाल्याचं लक्षात येताच त्या विवाहित महिलेचे नग्न फोटो काढण्यात आले. दरम्यान त्यानंतर एके दिवशी विशाल याने त्या विवाहितेला फोन करत तिला घरी भेटायला बोलावले. यावेळी घरी कशाला भेटायला येऊ म्हणून त्या महिलेने विचारले असता, त्याने विवाहितेला तुझे नग्न फोटो माझ्याजवळ आहेत, न आल्यास तुझ्या पतीला फोटो दाखवतो, अशी धमकी दिली.

कोल्हापुरात खळबळ! हळदकुंकू लावलेल्या अवस्थेत आढळला बालकाचा मृतदेह

भीतीपोटी त्या महिलेने विशालचे घर गाठले असता, त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी विशालच्या मोबाईलमध्ये विवाहितेने फोटो बघितले असता, ते फोटो २०१३ मध्ये विशालने गुंगीचे औषध पाजून काढले असावे, असा अंदाज महिलेला आला होता. तेव्हापासून २०२० पर्यंत विशाल वारंवार त्या विवाहितेला तुझ्या पतीला फोटो दाखवतो अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता.

या प्रकरणी रविवारी पीडित महिलेने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याबाबत रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत. याबाबतचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here