नवी दिल्लीः दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात. त्याला असं म्हणतात. या लीप वर्षाचं महत्त्व पटवून देण्यासाठी गुगलनं खास डुडल साकारलं आहे. गुगल नेहमीच खास दिवसांसाठी कलात्मक डुडल साकारुन त्या दिवसांचे महत्त लोकापर्यंत पोहोचवते.

लीप वर्ष म्हणजे काय?

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर सर्वांनाच ठावूक आहे. पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. पण खरंतर, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५.२४२ दिवसांचा काळ लागतो. ०.२४२ या वेळ आपण धरत नाही. दर ४ वर्षांनी या वेळेचे मिळून २४ तास होतात. म्हणजे एक पूर्ण दिवस. हा एक दिवस वाढल्याने फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्ष सोडले तर इतर वर्षी फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा होतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here