हायलाइट्स:
- बाप-लेक, पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला
- नगरमध्ये तब्बल ७ जणांचा बुडून मृत्यू
- नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
श्रीगोंदा तालुक्यात ११ महिन्यांची मुलगी कालव्याच्या पाण्यात पडून वाहून गेली. कोपरगावमध्ये मंडपी नाल्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना मुलासह पित्याचाही बुडून मृत्यू झाला. संजय मारूती गोरे (वय३५) व सचिन संजय मोरे (वय १५) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बाप-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू
कोपरगाव परीसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने परीसरातील ओढे नाले ओसांडून वहात आहे. मंगळवारी दुपारी वडील संजय मोरे यांच्याबरोबर मुलगा सुनिल मंडपी नाल्यावरून जात असताना सुनिलचा तोल जावून तो नाल्यात पडला. ही बाब वडील संजय यांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात उडी घेवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मुत्यु झाला.
दोघे सख्ये भाऊ पुराच्या पाण्यात वाहिले
राहुरीतील गणपती घाट येथे दुपारी पाच मुले नदीत पोहण्यासाठी गेली होती. त्यातील राहुल बाळू पगारे (वय १५) व सुमित बाळू पगारे (वय १४) हे दोघे सख्ये भाऊ पुराच्या पाण्यात वाहून गेले. तिघे जण सुखरूप काठावर आले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. हे पाचही मित्र असून पोहण्यासाठी नदीच्या पात्रात गेले होते. मध्यभागी बेटासारख्या असलेल्या खडावर ती थांबली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघे वाहून गेले.
महिला व एक पुरुष पाण्यात बुडाले
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी शिवारात बंधार्यात मासे पकडण्यासाठी गेलेले एक महिला व एक पुरुष पाण्यात बुडाले. दुपारी हे दोघेजण माळेवाडी येथील बंधार्यात मासे पकडण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही बुडाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times