नागपूरः नागपूरात निकालात बदल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे, नागुरात मतमोजणी सुरू केल्यानंतर अवघ्या काही वेळातच भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, नंतर १० मिनिटांतच निकालात बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले असून आज मतमोजणी सुरू आहे. दवालमोटी गणात सुरुवातीला भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणी केल्यानंतर काँग्रेसच्या सुलोचना ढोक या १० मतांनी विजयी झाल्या आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here