हायलाइट्स:
- ZP निवडणुकांमध्ये शिवसेनेला सर्वात मोठा धक्का
- खासदारांच्या मुलाचा भाजपकडून दारुण पराभव
- शिवसेनेला आगामी निवडणुकांच्या काळात याचा मोठा फटका बसू शकतो?
वणई गटात भाजपचे पंकज कोरे यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा दारुण पराभव केला. हाती आलेल्या माहितीनुसार, पंकज कोरे हे विजयी झाले असून ४१२ मतांनी पंकज कोरे यांनी विजय पटकावला आहे. राजेंद्र गावित यांच्या मुलाला म्हणजेच रोहित गावित या वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. पण इथे जनतेनं त्यांना नाकारलं आहे. त्यामुळे याचा थेट फटका शिवसेनेला बसणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
खरंतर, रोहित गावित यांचा जनतेशी कोणत्याही प्रकारचा जनसंपर्क नव्हता. तरीही त्याला तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी पोकळी मानली जाते. शिवसेनेला आगामी निवडणुकांच्या काळात याचा मोठा फटका बसू शकतो.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या.
प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी:
धुळे- ६० टक्के
नंदुरबार- ६५ टक्के
अकोला- ६३ टक्के
वाशीम- ६५
नागपूर- ६०
पालघर- ६५.
मतदानाची एकूण सरासरी- ६३ टक्के
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times