हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटलांची लेक बिनविरोध विजयी
- धुळ्यात भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर
- शिवसेनेला धुळ्यात मोठा धक्का
भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कन्या धरती देवरे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे तर धरती देवरे या चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांना भाजपकडू लामक गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत धरती देवरे यांना जनतेने बिनविरोध विजयी केलेलं आहे. त्यामुळे आता धुळ्यात भाजपला बहुमतासाठी चौदा जागांपैकी फक्त दोन जागांची गरज आहे.
खरंतर, यातील एका गटामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे. धुळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी मतदान झालं. धुळ्याचा एकूण राजकीय इतिहास पाहायला गेलं तर सध्या जिल्हा परिषदेची सत्ता ही भाजपच्या हातात आहे. त्यामुळे आताही भाजपला धुळ्यात वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळणार का ? हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
हा शिवसेनेसाठी आणि महाविकासआघाडीसाठी मोठा धक्का मानला जातो. भाजप धुळ्यात बहुमतापासून अगदी जवळ आहे. जर भाजपला हे बहुमत मिळालं तर आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला याचा मोठा फटका बसू शकतो. (ZP Election Result Dhule 2021 Chandrakant Patil मुलगी धरती देवरे विजयी)
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या.
प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी:
धुळे- ६० टक्के
नंदुरबार- ६५ टक्के
अकोला- ६३ टक्के
वाशीम- ६५
नागपूर- ६०
पालघर- ६५.
मतदानाची एकूण सरासरी- ६३ टक्के (ZP Election Result Dhule 2021 Chandrakant Patil daughter dharti deore wins )
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times