हायलाइट्स:

  • आर्यन खानच्या अडचणीत वाढ
  • आर्यनच्या मोबाईलची फोरेन्सिक तपासणी होणार
  • आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटच्या संपर्कात असल्याचा एनसीबीचा आरोप

मुंबई: अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) आर्यन खान आणि त्याच्यासह अटक करण्यात आलेल्या व्यक्तींविरोधात अधिक कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आर्यन खान आणि त्याच्यासह इतरांच्या मोबाईलमधून काही आक्षेपार्ह व्हॉट्अॅप चॅट मिळाले होते. त्यावरून या सर्वांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध आल्याचा आरोप एनसीबीने केला आहे.

तपास एनसीबीने अधिक सखोलपणे करायला सुरुवात केली आहे. याचा एक भाग म्हणून आर्यनचा मोबाईल एनसीबीने फॉरेन्सिक तपासणीसाठी गांधी नगर येथील एका लॅबमध्ये पाठवला आहे. या मोबाईलमधून काही डेटा, चॅट डिलीट तर करण्यात आलेले नाही ना याचा शोध घेण्यासाठी या मोबाईलची तपासणी केली जाणार आहे. एनसीबीने न्यायालयात दावा केला होता की आर्यनच्या चॅटमध्ये ड्रग्जची खरेदी करण्यासाठी पैशांच्या व्यवहाराबाबत बोलणे झाले होते. त्यासाठी विविध प्रकारचे कोड वापरण्यात आले होते.

NCB चौकशीवेळी आर्यन खान म्हणाला, ‘बाबा बिझी असतात, भेटायला अपॉइंटमेन्ट घ्यावी लागते’

याप्रकरणी आता एनसीबीने आणखी सहाजणांना ताब्यात घेतले आहे. यातील चारजण दिल्लीतील क्रे एक्सपीरियंन्स प्रायव्हेट लिमिटेड या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी संबंधित आहे. आतापर्यंत याप्रकरणी एनसीबीने १६ जणांना ताब्यात घेतले आहे.

आर्यन खान

दरम्यान, एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यनने नोजल स्प्रे, विज्ञानाच्या काही पुस्तकांची मागणी केली. अधिकाऱ्यांनी त्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या दिल्या. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन यांना डाळ- भात असे साधे खाणे दिले. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काहीजणांसाठी तर नजीकच्या हॉटेलमधून बिर्याणी मागवली होती.

लाडात वाढलेला, फाइव्ह स्टारमध्ये जेवणारा आर्यन खान खातोय तुरुंगातला डाळ- भात

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here