हायलाइट्स:
- एसटी-ट्रकमध्ये भीषण अपघात
- धडक होताच वाहनांनी घेतला पेट
- भीषण अपघातामध्ये १२ प्रवासी जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, १२ प्रवासी जखमी झाले असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तर दोन्ही वाहनांना लागलेली आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे.
अकोला जिल्हातील बाळापुर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या शळदफाट्यांवर जवळ दुपारी एक वाजता भीषण अपघात झाला. बाळापूरवरून अकोलाकडे जाणाऱ्या एस.टी बसची व अकोलावरुन कोळशांचा ट्रक बाळापुरकडे भरुन येत असतांना आमने सामने धडक झाली
अचानक एसटीने पेट घेऊन कोळशांने भरलेल्या ट्रक होता, त्याने सुध्दा पेट घेतला. ट्रक व एसटी बस जळून खाक झाली. याच एस.टी. बसमधील १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बसचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला सर्वीपचर रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले तर बाळापुर महामार्गावर यावेळी गाड्याची राग लागलेली होती. तसेच बाळापुर नगर परिषदेचा अग्निशामन गाडीने ही आग विझवली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times