हायलाइट्स:
- आर्यनच्या अटकेनंतर सुहाना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
- ट्रोलर्सपासून वाचण्यासाठी सुहानाचा मोठा निर्णय
- शाहरुखने या प्रकरणी दिलेली नाही कोणतीही प्रतिक्रिया
टप्पूने शेअर केला नट्टू काकांचा मृत्यूपूर्वीचा फोटो, म्हणाला..
सुहाना सध्या परदेशात असून ती तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना सोशल मीडियावर सक्रिय असते. सुहाना तिच्या मैत्रिणीसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. परंतु, आर्यनच्या अटकेनंतर जणू सुहानाचे ग्रह देखील फिरले. नेटकऱ्यांनी सुहानाला आर्यनबद्दल आणि तिच्या घरातल्यांबद्दल निरनिराळे प्रश्न विचारून ट्रोल करायला सुरुवात केली. यावर उपाय म्हणून सुहानाने ठोस निर्णय घेत इन्स्टाग्राम अकाउंटचं कमेंट सेक्शन बंद केलं. जेणेकरून कुणीही तिच्या फोटोंवर वाईट कमेंट करून सुहानाला मानसिक त्रास देऊ नये.

सुहानाच्या या निर्णयाची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सुहानाच्या या निर्णयाची युझर्स थट्टा करत आहेत. तर दुसरीकडे आर्यन सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आर्यनला न्यायालयात नेण्यात येणार आहे. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times