लातूर : आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या हे टोकाचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार लातूरमध्ये समोर आला आहे. लातूरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने थेट बसमध्ये गळफास घेतल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून एसटी महामंडळातही खळबळ उडाली आहे.

उदगीर बस स्थानकात एका एसटी चालकाने ५ ऑक्टोबर रोजी एम एच १४ बीटी २१६० या क्रमांकाच्या बसमधे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजय रामराव केसगिरे असे मृत बस चालकाचे नाव आहे. त्यांनी गळफास लावून घेतल्याचे पाहताच बस स्थानकातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ उदगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरानी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मुलं होण्यासाठी धक्कादायक प्रकार, भोंदूबाबा २४ वर्षीय युवक-महिलांना द्यायचा नारळ, धागा, विडी आणि माचिस, नंतर…
वेळेवर वेतन मिळत नसल्याने संजय रामराव केसगिरे आर्थिक विवंचनेत होते. या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संजय केसगिरे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा आणि १मुलगी असा परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास उदगीर पोलीस करत आहेत.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याना अतिशय तुटपुंजे वेतन असून तेही वेळेवर मिळत नाही, त्यामुळे कर्मचारी सातत्याने आंदोलन करत आहेत. अशी परिस्थिती अन्य कर्मचाऱ्यावर येऊ नये यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघर्ष एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ म्हणत केला भयंकर प्रकार, विवाहित महिलेचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ पाठवला पतीला

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here