हायलाइट्स:

  • आर्यन खानकडे कोणतेही अमलीपदार्थ आढळून आले नाही
  • आर्यनचा मित्र अरबाझ मर्चंटजवळून केले केवळ सहा ग्रॅम चरस जप्त
  • आर्यन व अरबाझच्या वकिलांनी कोर्टात त्यांचा जबाब वाचून दाखवला

मुंबई: क्रूझशिपमधील एका रेव्ह पार्टीवर केलेल्या छापेमारीत एनसीबीने शनिवारी रात्री अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य सात जणांना ताब्यात घेतले होते. कोर्टात एनसीबीने स्पष्ट केले की, आर्यनजवळ कोणतेही अमलीपदार्थ आढळून आले नाही. मात्र आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट जवळून सहा ग्रॅम चरस हस्तगत केले होते. मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, यानंतरही आर्यनला एनसीबीच्या कोठडीत का ठेवले गेले.

आर्यनचा जबाब वाचताना वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, ‘पंचनाम्यात स्पष्ट आहे की, माझ्याकडून मोबाईल फोन व्यतिरिक्त काहीही हस्तगत करण्यात आले नाही. माझ्या मित्राला यासाठी अटक केली कारण त्याच्याकडे ६ ग्रॅम चरस आढळून आले, ज्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. ज्या अमली पदार्थाचा उल्लेख कोठडीत ठेवण्यासाठी केला जात आहे, ते देखील आमच्याकडे सापडले नाही. मला या जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांशी जोडले जाऊ शकत नाही.’

NCB चौकशीवेळी आर्यन खान म्हणाला, ‘बाबा बिझी असतात, भेटायला अपॉइंटमेन्ट घ्यावी लागते’

याला दिलेल्या उत्तरात एनसीबीतर्फे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंह यांनी सांगितले की, ‘आर्यनकडे अमली पदार्थ मिळाले नाही, याचा अर्थ हा नाही की तो गुन्हेगार नाही. त्याच्या व्हॉट्सअॅपमध्ये काही ड्रग पेडलर्ससोबतचे चॅट्स मिळाले आहेत. सध्या त्यांचे पेमेंट्स मोड व त्यासाठी जे कोड वापरले गेले होते, त्यावरील तपास सुरू आहे. सर्व आरोपींना एकमेकांसमोर बसवून चाैकशी करण्याची आवश्यकत आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा तपास करायला हवा. एखाद्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडले नसले, तरीही ते कुठून येत आहे, याचा तपास करणे आवश्यक आहे.’

आर्यन खान

अरबाज मर्चंटचा वकील तारिक सईद यांनी बाजू मांडताना सांगितले की, ‘पंचनाम्यात म्हटले आहे की, आर्यनजवळ काहीही सापडले नाही. सोबतच दावा करण्यात आला आहे की, अरबाजवळून ६ ग्रॅम चरस आढळून आला आहे. मात्र जे एमडीएमए व कोकीन सापडले आहे, त्याच्याशी यांचा काहीही संबंध नाहीए. काय एनसीबी केवळ या दोन मुलांचीच चाैकशी करणार आहे का, ज्यांच्यापैकी एकाजवळ काहीच सापडले नाही तर दुसऱ्याजवळ केवळ सहा ग्राम चरस आढळून आली.’

लाडात वाढलेला, फाइव्ह स्टारमध्ये जेवणारा आर्यन खान खातोय तुरुंगातला डाळ- भात

या मुद्द्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील विवेक सूद म्हणतात की, ‘२००१ मध्ये एनडीपीएस कायद्यात बदल करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमली पदार्थांच्या प्रमाणात फरक करण्यात आला आहे. २००१ सालापूर्वी अमली पदार्थांच्या प्रमाणात कोणताही फरक करण्यात आलेला नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ, जर २००१ च्या अगोदर माझ्याजवळ १ ग्रॅम अमली पदार्थ आढळून आला, तर ते असेच मानले जाईल जसे कोणाकडे १ हजार किलोग्रॅम अमली पदार्थ आहे. तेव्हा कोणाकडे किती प्रमाणात अमली पदार्थ आहेत याच्याशी काहीही फरक पजत नव्हता. तेव्हा अमली पदार्थ घेणारे व त्यांची विक्री करणाऱ्यांना एकसमान मानले जात होते. आता यात बदल करण्यात आला आहे. आता कायद्यात अमली पदार्थ घेणारे आणि त्याची विक्री करणारे यांना वेगवेगळे पाहिले जाते. ‘

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here