संध्याकाळी ५.३० ते ७ च्या दरम्यान ठाणे, रायगड जिल्ह्यात खूप तीव्र १०-१२ किमी उंचीचे ढग होते. ज्यामुळे या परिसरात जोरदार पाऊस पडला. मुंबईमध्येही त्याचा प्रभाव जाणवला.
पुण्यातही पावसाचा धुमाकूळ
पुणे आणि परिसरात मागील ३ तासांत मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. शहरात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला.
परतीच्या पावसाला सुरुवात
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आज ६ ऑक्टोबर पासून राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून सुरुवात झाली आहे. गुजरातच्या काही भागातून, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशचा काही भाग असा भाग परतीच्या पावसासाठी पुढील २४ तास अनुकूल असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times