हायलाइट्स:
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा
- ‘नवरात्र सर्वांच्या जीवनात शक्ती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो’
- १५ ऑक्टोबर रोजी दसऱ्यासहीत नवरात्रौत्सवाची सांगता होणार
दुर्गा मातेची पूजा-अर्चना करताना एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधानांनी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
दुसऱ्या एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शैलपुत्री देवीच्या प्रार्थनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहेत. ‘नवरात्रीचा हा पहिला दिवस आहे. आपण शैलपुत्री देवीची प्रार्थना करतो. ही देवीला समर्पित केली जाणारी एक स्तुती’ असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलंय.
दुर्गामातेच्या उपासनेचा पवित्र सण नवरात्रीला आज घटस्थापनेपासून प्रारंभ होतोय. वर्षभरात दोन वेळा नवरात्री साजरी केली जाते. पहिल्यांदा चैत्र नवरात्र आणि दुसऱ्यांदा शारदीय नवरात्र. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गामातेच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. तसंच दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त उपासही करतात.
आजपासून सुरू झालेला नवरात्रौत्सव येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. यंदा तृतीया आणि चतुर्थीची तिथी एकत्र आल्यानं नवरात्र आठ दिवस साजरी होणार आहे. म्हणजेच, १५ ऑक्टोबर रोजी दसरा अर्थात विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times