हायलाइट्स:
- वाळूनं भरलेल्या ट्रकचा चुकीच्या बाजुनं प्रवास इतरांच्या जीवावर उठला
- अपघातात १४ जणांनी प्राण गमावले तर ३० जण गंभीर जखमी
- जखमींना बाराबंकीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं
बस आणि ट्रकमध्ये धडक झाल्यानंतर अवाढव्य ट्रकचाही चक्काचूर झालाय. अपघातग्रस्त गाड्यांची अवस्था पाहिल्यानंतर हा अपघात किती भयंकर होता याची कल्पना येऊ शकेल.
गुरुवारी पहाटे ५.०० वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडल्याचं समजतंय. लखनऊपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर देवा स्टेशन परीसरात माती रोडवर हा अपघात घडलाय.
वाळूनं भरलेल्या आणि चुकीच्या बाजुनं भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं समोरून येणाऱ्या व्होल्वो बसला जोरदार धडक दिली. डबलडेकर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अपघातामुळे जोरदार झटका बसला. या अपघातानंतर वाहनचालकानं घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती हाती येतेय.
जखमींना बाराबंकीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करणयात आलंय. काही जखमी प्रवाशांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी लखनऊला धाडण्यात येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूनं भरलेला ट्रक दिल्लीहून बहराइचला जात होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्यानं बस आणि ट्रकचा मलबा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times