जयंत सोनोने

झाडांची गर्द राई व घाटांचा मेळ असलेला मेळघाट हा दुर्गम भाग म्हणजे जैवविविधतेने सुसंपन्न असलेला प्रदेश. गोंड, कोरकू, भिल्ल आदी आदिवासीचा असलेला हा भाग आहे. देश विदेशातील निसर्ग अभ्यासक याठिकाणी येऊन आपले भावविश्व समृद्ध करत असतात. अशिक्षित आदिवासीसुद्धा यात मागे नाहीत फक्त त्यांची नोंद घेतली जात नाही एवढंच तो फरक

११३ वर्षापासून अज्ञातवासात असलेला रानपिंगळा या पक्षाच्या अज्ञात वास व पुनर्शोध या विषयावर नुकतेच डॉ. जयंत वडतकर या नव्या दमाच्या पक्षी अभ्यासकाने प्रकाश टाकून चिकित्सक व पक्षी निरीक्षणात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोलाचा ऐवज तयार केला. डॉ. जयंत वडतकर हे पर्यावरण शास्त्र विषयात पारंगत पदवी घेऊन त्यांनी पुढे सातपुड्यातील फुलपाखरांची जैवविविधता या विषयावर संशोधनकरून आचार्य पदवी प्राप्त डॉ. वडतकर यांची पक्षी व वन्यजीव संवर्धन पर्यावरण जनजागृती क्षेत्रात विशेष सूची आहे.

जैवविविधता व पर्यावरण शास्त्राचा विविधांगाने अभ्यास करून विविध पक्षांवर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तक वाचकांच्या आतापर्यंत भेटीला आलेत मात्र फक्त एका पक्षावर अभ्यास करून लिहिलं होतं वाचकांच्या हाती दिलं तो डॉ. वडतकर यांनी. रानपिंगळा अज्ञात वास व पुनर्वसन हे त्यांचे पुस्तक सध्या चर्चेत आला आहे.

एकशे तेरा वर्षापूर्वी रानपिंगळा हा पक्षी भारतातून नामशेष झाला होता. १९९७ साली पक्षी अभ्यासकांमध्ये खळबळ उडवून देणारी एक घटना सर्वसामान्यांच्या समोर आली. अमेरिकन पक्षी शास्त्रज्ञांच्या चमूने भारतातून नष्ट झालेले असे समजल्या जाणाऱ्या चार पक्ष्यांच्या यादीत एक पक्षी ब्लेविटी म्हणजेच फॉरेस्ट spotted owlet याला शोधून काढण्यात यश मिळवले. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादाच्या जंगलात तो पुन्हा सापडल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर १९९८ साली मेळघाटात त्या पक्षाचे अस्तित्व शोधून काढण्यात अमरावतीच्या निसर्ग संरक्षण संस्थेच्या पक्षी अभ्यासकांनी यश मिळविले आणि सुरु झाला अज्ञातवासात गेलेल्या रानपिंगळा या पक्षाच्या पुनर्शोधाचा प्रवास.

घुबड या पक्षाला घेऊन समाजात अनेक समज- गैरसमज आहेत. घुबड हा प्रामुख्याने रात्री वावरणारा पक्षी पण असाच एक पक्षी दिवसा वावर तो म्हणजे ‘रानपिंगळा’ यालाच इंग्रजीमध्ये Forest spotted Owletअसं म्हणतात. या वेगळ्या प्रजातीचा प्रथम शोध लागला तो डिसेंबर १९७२ मध्ये ब्रिटिश पक्षी अभ्यासक belwit पक्षी निरीक्षण हा दरम्यान हा पक्षी वेगळा असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले पुढे १८७३ मध्ये पक्षी शास्त्रज्ञ ए.ओ. ह्यूम यांनी अभ्यास व विश्लेषण करून ही नवीन प्रजाती असल्याचे संशोधन मांडले. हा पक्षी पिंगळा या प्रजातीशी साम्य असल्यामुळे त्याला पिंगळा पक्षाच्या गटात समाविष्ट करण्यात आले.

WhatsApp प्रतिमा 2021-10-07 सकाळी 9.11.03 वाजता.

पुढे अज्ञातवासात गेलेला रानपिंगळा शोधण्यासाठी डॉक्टर सलीम अली व त्यांचे सहकारी जिल्लं रिप्ले यांनी १९७५ चाली ओरिसातील उत्तर आणि पश्चिम भागातील जंगलात एकोणिसाव्या शतकात या रानपिंगळा पक्षाचे नमुने गोळा केले होते. त्यात पदमपुर जवळील भूषण आणि या ठिकाणी त्याला शोधण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी यासाठी विविध मोहिमा राबविल्या डॉ. सलीम अली यांनी पिंगळा, शृंगी घुबड आणि शिंगडा घुबड यांच्या आवाजवरुन काही प्रतिसाद मिळतो का हेही तपासून बघितले मात्र यश मिळू शकले नाही. डॉ. सलिम आली यांनी १९७६मध्ये आपले लक्ष मेळघाट कडे वळवले. डॉक्टर सलीम अली यांनी यावेळी तब्बल दहा दिवस मेळघाटात तळ ठोकून मेळघाटच्या रायपूर, सेमाडोह आणि कोलकास व सीमेवरील तापी नदीच्या काठावर जंगलात त्यांनी पक्षाचा शोध घेतला.

रानपिंगळाच्या एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या नवीन अंतर तब्बल एकशे तेरा वर्षानंतर अमेरिकी पक्षी शास्त्रज्ञ डॉक्टर पामेला राज मोशेल यांनी त्याला २५ नोव्हेंबर १९९७ला महाराष्ट्रातील सातपुड्याच्या शहाद्या जंगलात शोधून त्याचा पुन्हा शोध लावला. १९९८ ला तो याठिकाणी ज्येष्ठ पक्षी अभ्यासक किशोर रिठे यांना आढळून आला मेळघाट म्हणजे मध्य सातपुड्यातील गाविलगड डोंगर रांगात बसलेला चार हजार चौरस मीटर पेक्षा विस्तीर्ण पसारा असलेला वाघांसाठी यांचा एकमेव नैसर्गिक जंगल यामध्ये सुमारे २८०० चौरस किमी हा भाग वाघांसाठी संरक्षित असल्याने वाघा बरोबर त्याचा छत्रछायायेतील सर्वच जैवविविधता संरक्षण झाले आहे. यामुळेच रानपिंगळाला सुद्धा संरक्षण मिळाले आहेत. मेळघाटातील उत्तर पूर्वेकडे चुनखडी, जरिदा हत्रू तसेच उत्तरेकडील रुई पठार, रंगुबेलि पर्यंतचा प्रदेश आज मानवी हस्तक्षेप व मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या वृक्षतोड व शिकारी यामुळे जण जंगलाची पत खालावल्याची खंत डॉक्टर जयंत वडतकर यांनी व्यक्त केली आहे. रानपिंगळाचा शोध घेत असताना मार्च २०१३ रोजी दोलाराम बाबा संरक्षण कॅम्प परिसरात एकाच दिवशी आठ पक्षी आढळून आल्याची नोंद सुद्धा या पुस्तकात आहे. मेळघाटच्या पश्चिमेकडील हरिसाल तारूबांदा, गाडगाभांडुप याठिकाणी हा पक्षी अधिक प्रमाणात आढळून आला आहे. येथील फालतू कासदेकर व नंदाराम भूसुम या दोन माहितगारांचा या संशोधनात मोलाचा वाटा.

जानेवारी ते फेब्रुवारी हा रानपिंगळा यांसाठी महत्त्वाचा काळ आहे. याच काळात पिल्ले अंड्यातून तर काही घरट्यातून बाहेर पडतात. रानपिंगळाची सध्याची स्थिती व धोके यासंदर्भात बोलताना डॉ. जयंत वडतकर सांगतात की अलीकडे संकुचित होत असलेली जंगल, संरक्षित नसलेल्या जंगलात होणारी अवैध वृक्षतोड, शेतीसाठी होणारे अतिक्रमण वनहक्क कायद्यांतर्गत वाटली जाणारी जंगलं, जुन्या मोठ्या झाडांची तोड, लागणारे वणवे व गुरे सराईमुळे रानपिंगळाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी घुबडांच्या प्रजातीला जादूटोणा सारख्या प्रकारात सुद्धा वापरले जात असल्याने त्यातून घुबड प्रजातीचा व पर्यायाने रानपिंगळा सुद्धा धोका असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.

डॉ. जयंत वडतकर सांगतात मेळघाट हा रानपिंगळा साठी सर्वात सुरक्षित आदिवास मानला जात असला तरी यातील वन अभयारण्यातून जाणाऱ्या साठ वर्ष जुन्या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण रानपिंगळाच्या आदिवासासाठी भविष्यातील मोठी समस्या ठरणार आहे. या मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर झाल्यानंतर या मार्गावर रेल्वेचे ताशी १०० पेक्षा जास्त वेगाने दिवसभरात २४ ते २८ फेऱ्या होणार आहेत. या मार्गापासून पारखेड आहे पुनर्वसित गाव अवघ्या एक किमी अंतरावर असून हा रानपिंगळासाठी येथील सर्वात संपन्न असा अधिवास आहे. रेल्वेचे विस्तारीकरण करताना पर्यायी मार्ग हा अधिक फायदेशीर असताना जंगलातून रेल्वे नेण्याचा राजकीय अट्टाहास रानपिंगळाच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. आज मोजक्या प्रमाणात उरलेली जंगल आणि अधिवास वाचविण्यासाठी सामान्य जनतेने अज्ञान आणि दुर्लक्ष आणि राजकीय पक्षांची असंवेदनशील भूमिका ही परिस्थिती भविष्यासाठी नक्कीच विचार करायला लावणारी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here