हायलाइट्स:
- दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सामान्य नागरिक
- पाच दिवसांत पाच सामान्य नागरिकांची हत्या
- ‘द रेजिस्टन्स फ्रंट’नं स्वीकारली एका हत्येची जबाबदारी
ईदगाह भागातील संगम शाळेत हा गोळीबार करण्यात आला. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चांद यांची हत्या करण्यात आलीय.
सामान्य नागरिक निशाण्यावर
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांतून दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर घेतल्याचं समोर येतंय. गेल्या पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार करण्याची ही पाचवी घटना आहे.
पाच दिवसांत पाच हत्या
या अगोदर बुधवारी अवघ्या दोन तासांत दहशतवाद्यांकडून तीन नागरिकांची हत्या करण्यात आली होती. श्रीनगरच्या इक्बाल पार्क परिसरात बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. बिंदरू यांच्या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) नं स्वीकारली होती. १९९० च्या दशकात जम्मू काश्मीरमध्ये फैलावलेल्या दशतवादानंतरही काश्मीर पंडित समुदायाशी निगडीत बिंदरू यांनी आपल्या पत्नीसोबत इथेच राहण्याचा निर्णय घेतला होता. इथेच ते आपलं मेडिकल चालवत होते.
बिंदरू यांच्या हत्येनंतर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्या एका सामान्य व्यक्तीलाही गोळ्या घालून ठार केलं. ही व्यक्ती मूळची बिहारच्या भागलपूरची रहिवारी वीरेंद्र पासवान असल्याचं समजतंय.
तसंच अज्ञात बंदुकधारी दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात एका नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. SUMO अध्यक्ष नायदखाई मोहम्मद शफी उर्फ सोनू यांना दहशतवाद्यांनी आपल्या निशाण्यावर घेतलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times