म. टा. वृत्तसेवा, संगमनेर

आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याचे विधेयकात रुपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. आमचे सरकार कोर्टात टिकेल असे ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना आरक्षण देणारच. हीच कॉंग्रेसची भूमिका असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री यांनी सांगितले.

थोरात संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडणुकीनंतर ‘मटा’शी बोलत होते. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केली अन् त्याचदिवशी रात्री या मुलाच्या वडिलांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. याबाबत थोरात म्हणाले की, शेतकऱ्याने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे. लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी निश्चित प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता शेतकऱ्याच्या खात्यावर आम्ही कर्जमाफी करत पैसे दिले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी का आत्महत्या केली? नेमक काय चुकतंय याचा विचार आम्हाला करावा लागेल असेही थोरात म्हणाले. सरकारने मदत दिल्याशिवाय देशात कुठेही शेतकरी उभा राहू शकत नाही. तरीही आपले मनोबल पक्के ठेऊन आणि समस्यांना सामोरे जावे. कुटुंब आपल्या पाठीमागे आहे सरकारही त्यांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here