हायलाइट्स:

  • अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केला बलात्कार
  • नराधमाच्या घरी जाताच पोलीस हादरले
  • या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ

विरार : राज्यात कितीही कठोर नियम केले तरीही महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. महाराष्ट्रात रोज म्हटलं तरीही एक महिला अत्याचाराची घटना समोर येते. विरारमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने जबरदस्ती बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी दुकानात गेली असता आरोपीने तिला स्वतःच्या घरात जबरदस्ती नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणात पॉस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधमाने केलेला हा प्रकार समोर येताच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्थानकात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

मालक गाडीतून खाली उतरला आणि चालकाने १ कोटी रुपये पळवले; पुण्यात खळबळ
या नराधमा विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आलेली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या आधीही आरोपीनं मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी हा दुसऱ्यांदा प्रकार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

दरम्यान, आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले असता त्याचा मृतदेह भयावह अवस्थेत आढळला. आरोपीनं आत्महत्या का केली? या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करत असून त्याची ही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील घटस्थापनेचा LIVE VIDEO, भक्तांसाठी घर बसल्या मंगलमय दर्शन

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here