हायलाइट्स:

  • करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील घटस्थापनेचा LIVE VIDEO
  • भक्तांसाठी घर बसल्या मंगलमय दर्शन
  • मंगलमय वातावरणात अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहुर्तावर सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना झाल्यावर करवीरनिवासिनी अंबाबाई (kolhapurchi ambabai)मंदिरात नवरात्रोत्सवास (navratri 2021)धार्मिक आणि मांगल्यमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. ऑनलाईन दर्शनास भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला असून भाविकांना सुलभपणे दर्शन होत आहे. महाद्वारात मात्र दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

पहाटे चार वाजता मंदिर उघडल्यावर नित्यनियमाने देवीची पूजा झाली. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना झाल्यावर मानाची तोफ उडवून घट बसवण्याची वर्दी देण्यात आली. त्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या गाभारा आणि मंडपात आकर्षक फुले आणि फळांची आरास केली आहे. मंदिरात प्रसन्न वातावरणामुळे आणि गर्दी नसल्याने भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळत असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

करोना संकट कायमचं जाऊ दे; मुख्यमंत्र्यांची मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना
घटस्थापनेपूर्वी पहाटे पाच वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. बुकींग केलेल्याची खात्री करुन भाविकांना मास्क तोंडाला लावून आणि सॅनिटायझर लावून सोडण्यात आले. गर्दी नसल्याने प्रत्येक भाविकाला सात ते दहा मिनिटात दर्शन होत आहे. घंटा चौकात भाविक मनोभावे नतमस्तक होत असल्याचे चित्र पहायला मिळाले. ऑनलाईन बुकींग न केलेल्या भाविकांना महाद्वारातून मुख दर्शनाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. भाविकांकडून महाद्वाराच्या पायरीवरच ओटी, पूजेचे साहित्य ठेवण्यात येत होते. काही माहिला भाविकांनी पायरीवरच देवीसाठी आणलेल्या साडीचे पूजन केले.

मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आली असून भाविकांना तपासून सोडले जात आहे. मंदिर परिसरात मेडिकल कॅम्प सुरू करण्यात आला असून रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली आहे.

आंगणेवाडीतील भराडी देवी मंदिर ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद, भक्तांसाठी आहेत महत्त्वाच्या सूचना

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here