हायलाइट्स:
- काँग्रेस नेते व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांचा हल्ला
- अमरावती जिल्हा बँक निवडणूक वाद विलोपाला
- पराभवा झाला म्हणून बच्चू कडू राग काढत असल्याचा आरोप
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. या निवडणुकीत सहकार पॅनल यश संपादन केले आहे. याच यशाचा जल्लोष करत असताना काही कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने कालपासूनच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यात येत होतं. अशाप्रकारे हल्ला होऊ शकतो अशी शक्यता सुद्धा माजी आमदार जगताप यांनी वर्तविली होती.
याच घटनेच्या अनुषंगाने आज सकाळच्या सुमारास चांदूर रेल्वे मतदार संघातील माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर काही तरुणांनी दगडफेक करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या हल्ल्याबद्दल बोलताना माजी आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले की, सदर हल्ला हा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हा हल्ला जाणीवपुर्वक घडून आणला आहे अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो अशी सूचना आम्ही पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी ज्या तरुणांना पकडले दोनही प्रहारचे कार्यकर्ते असून त्यांना बच्चू कडू यांचे सातत्याने फोन सुरू आहे, वाटल्यास डीसीआर तपासून पोलिसांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी माजी आमदार जगताप यांनी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times