हायलाइट्स:
- हरियाणा नारायणगढमाधली घटना
- भाजप खासदार नायब सैनी यांच्यावर आरोप
- ‘भाजपचे नेते चक्रावले आहेत का?’
भाजप नेत्यांचा विरोध करण्यासाठी दाखल झालेल्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. दरम्यान, या घटनेत एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. जखमी अवस्थेत शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
कुरुक्षेत्रातील भाजपचे खासदार नायब सैनी यांच्या ताफ्यातील गाडीनं नारायणगढमध्ये विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप, काँग्रेसकडून करण्यात आलाय.
‘भाजपचे नेते चक्रावले आहेत का?’
यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी या घटनेचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. ‘भाजप नेते चक्रावले आहेत का? कुरुक्षेत्रातील भाजप खासदार नायब सैनी यांच्या ताफ्यानं अंबालाच्या नारायणगढमध्ये विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली’ असं श्रीनिवास यांनी म्हटलंय.
नारायणगढमध्ये एका सन्मान सोहळ्यात क्रीडा मंत्री संदीप सिंह आणि कुरुक्षेबातील खासदार नायब सैनी दाखल होणार होते. ही गोष्ट आंदोलकांना समजल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी आंदोलक या कार्यक्रमाचा विरोध करत घटनास्थळी दाखल झाले होते. इथे शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान, एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. शेतकऱ्याला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, आज उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात गेल्या रविवारी, ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याेळी, सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी एक दिवसाचा वेळ दिला आहे. या अहवालात मृतांची माहिती, एफआयआर, आरोपी कोण आहेत? कुणाकुणाला अटक करण्यात आली? चौकशी आयोग इत्यादीबाबत विस्तृतपणे माहिती सर्वोच्च न्यायालयानं सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times