म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः आई आजारी असल्याचे कारण सांगून, मानलेल्या बहिणीने उसनेने घेतलेले सात लाख रुपये परत देण्यास नकार दिल्याने तरुणाने केली. हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने मुंबईतील एका मैत्रिणीकडून हे पैस घेतले होते. पैसे परत करण्याऐवजी आरोपी महिलेने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी या तरुणाला दिली होती. त्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करत असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर भटू जाधव असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा भाऊ विकास याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. किशोर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी एका अभ्यासिकेमध्ये त्याची तरुणीशी ओळख झाली. किशोर तिला बहीण मानत होता. या तरुणीने आई आजारी असल्याचे कारण सांगून किशोरकडून सात लाख रुपये उसने घेतले. किशोरने मुंबईतील मैत्रिणीकडून पैसे घेऊन तिला दिले. आता त्या तरुणीने पैसे देण्यास नकार दिला. त्या तरुणीने प्रियकराच्या मदतीने किशोरला धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमक्या दिल्या. किशोर जाधव याने ३० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये या तरुणीसह पाच जणांकडून छळ होत असल्याचे लिहिले आहे. या प्रकरणी विकास जाधव याच्या फिर्यादीवरून कृष्णा पोलिस, शोएब व आर्यन यांच्यासह तीन महिलांच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल सोनवणे करीत आहेत.

दुकान टाकण्याचा होता विचार
मृत किशोर जाधव याने आपला भाऊ विकासला २४ सप्टेंबर रोजी फोन केला होता. फोन करून त्याने सांगितले होते, की ‘मी सीबीआयची परीक्षा-मुलाखत दिली आहे. त्याचा निकाल दोन महिन्यांमध्ये लागणार आहे. नोकरी नाही लागली, तर मी माझ्या मैत्रिणीकडून पैसे घेऊन स्पेअरपार्टचे दुकान टाकणार आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here