रेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स | अपडेट केलेले: 7 ऑक्टोबर, 2021, 4:16 PM
कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघरमध्ये पुढील ३-४ तासात पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी अशी माहिती आयएमडी मुंबईकडून देण्यात आली आहे.

Weather Alert : राज्यासाठी पुढचे ४ तास महत्त्वाचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
हायलाइट्स:
- राज्यासाठी पुढचे ४ तास महत्त्वाचे
- IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- नागरिकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी
कालच्या या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी ३०-४० किमी/ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडेल. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघरमध्ये पुढील ३-४ तासात पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी अशी माहिती आयएमडी मुंबईकडून देण्यात आली आहे.
परतीच्या पावसाला सुरुवात
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आज ६ ऑक्टोबर पासून राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून सुरुवात झाली आहे. गुजरातच्या काही भागातून, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशचा काही भाग असा भाग परतीच्या पावसासाठी पुढील २४ तास अनुकूल असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
जवळपासच्या शहरांमधील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times