हायलाइट्स:

  • उपवासासाठी भगर खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांना विषबाधा
  • भगरमध्ये विषारी पदार्थ होता का? तपासणी होणार
  • या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ

जालना : आजपासून देशभरात नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक राज्यात मोठ्या भक्तीभावाने हा सण साजरा केला जातो. पण जालन्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरात्रीनिमित्त उपवास असल्याने कुटुंबाने भगर खाल्ली. यामुळे एकाच कुटूंबातील ६ जणांना विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ३ महिला २ पुरुष आणि एका मुलीचा समावेश आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात ही घटना घडली आहे. सध्या या सर्व रुग्णांवर वडीगोद्री येथील साई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील एका महिलेची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Weather Alert : राज्यासाठी पुढचे ४ तास महत्त्वाचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
आज सकाळी या सर्वांनी एकाच वेळी फराळ केला. त्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. यामुळे गावातील नागरीकांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या यातील ५ जणांची प्रकृती स्थिर असून एका महिलेला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, भगरमध्ये काही विषारी पदार्थ होता का? याची आता तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण आधीच करोनाचा भीषण काळ सुरू आहे. त्यामुळे स्वच्छता हा सध्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही पदार्थ विकत घेताना किंवा खाताना ते खाण्यायोग्य आहे का ? याची पडताळणी करावी.

पिकअप गाडीला मोठा अपघात; ५० फूट खोल दरीत कोसळली, एक ठार

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here