औरंगाबाद :रेल्वे येण्‍या-जाण्‍याच्‍या वेळी रेल्वे गेट बंद न केल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे गेटमन श्रीरंग माणिकराव गायकवाड याला एक महिन्‍याचा कारावास आणि २५० रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी ठोठावली आहे. या प्रकणात लिंबाजी सोपानराव घाटोळ (रा. सावरगाव, ता. मानवत, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादीनुसार, ६ जून २०१७ रात्री ११ वाजता फिर्यादी हा मित्र बाबासाहेब काळे व पुंजा भाऊ जाधव यांच्‍यासह जीपने (एमएच-३०-बी-१५५६) परभणीहून सावरगावाकडे येत होता. दरम्यान, साडेअकरा वाजता जीप भीमनगर (परभणी) येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रं. १२० आली. तेथील गेट बंद नसल्‍याने फिर्यादीने जीप गेटच्‍या पुढे नेण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍याचवेळी मनमाडहून परळीकडे जाणाऱ्या अजिंठा एक्सप्रेसने (७०६३) फिर्यादीच्‍या जीपला जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादीसह त्‍याचे दोन्‍ही मित्र गंभीर जखमी झाले.

lakhimpur case : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी २ जणांना अटक, केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा सापडेना

उपचारादरम्यान बाबासाहेब काळे यांचा मृत्‍यू झाला. प्रकरणात नांदेड लोहमार्ग ठाण्‍यात तत्कालीन गेटमन श्रीरंग गायकवाड व स्‍टेशन मास्‍टर बबन दगडुजी नारनवरे (४६, रा. परभणी) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील ए. व्‍ही. घुगे यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी गेटमन श्रीरंग गयाकवाड याला दोषी ठरवून भादंवी कलम ३३६ अन्‍वये एक महिना कारावास व २५० रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवसांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. तर, बबन नारनवरे यांची सबळ पुराव्‍याअभावी मुक्तता केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here