स्वानंद चॅरिटेबल ट्र्स्ट, हिंदू हेल्पलाइन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सावरकरांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळेच कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली. कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकार वाट का पाहत आहे, असा थेट सवाल यावेळी पोंक्षे यांनी केला. सावरकरांना भारतरत्न दिल्यास तो भारतरत्नाचाच सन्मान ठरेल, असे नमूद करताना सावरकरांना भारतरत्न म्हणायला सुरुवात करा, असे आवाहन पोंक्षे यांनी केले. व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करण्याची संस्कृती घातक असून सावरकरांचे विचार फॉरवर्ड करण्यापेक्षा ते प्रत्यक्ष मांडण्याची गरज असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. सावरकरांना जाऊन ५४ वर्ष झाली असली तरी अजून नेत्यांना त्यांची दहशत वाटते, अशा शब्दांत पोंक्षे यांनी सावरकरस्तुती केली. इंग्रजी ही धेडगुजरी, दळभद्री भाषा असल्याचेही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times