सुवर्णपदक, दहा लाख स्वीडिश क्रोनर (अंदाजे ११ लाख डॉलर) असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. गेल्या वर्षी साहित्याचे नोबेल अमेरिकेतील कवी लुईस ग्लुक यांना जाहीर झाला होता.
वसाहतवादाच्या परिणामांचा शोध घेण्यासह आखाती देशातील नागरिकांवर झालेले त्याचे परिणाम, निर्वासितांच्या समस्या या साऱ्याचा यथार्थ वेध गुरनाह यांनी आपल्या साहित्यात घेतला’, असेही अकादमीने म्हटले आहे. नोबेल पारितोषिकाच्या साहित्य विभागाचे प्रमुख अँड्रेस ओल्सन म्हणाले, ‘जगातील वसाहतवादोत्तर काळातील अब्दुलरझाक हे एक महत्त्वाचे लेखक असून, त्यांची निरीक्षणे, त्यांनी वसाहतवादावर केलेले भाष्य आदी गोष्टींचा विचार करून त्यांना नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे.’
वसाहतवादाच्या परिणामांची नोंद घेऊन त्याबाबत स्वत:ची निरीक्षणे नोंदविणारे अब्दुलरझाक गुरनाह हे इंग्रजी साहित्यातील एक बडे प्रस्थ मानले जाते. नव्वदच्या दशकात उदयाला आलेल्या या साहित्यिकाला यंदाचा नोबेल जाहीर झाला. त्यांच्या कारकिर्दीविषयी…
लेखकाची पार्श्वभूमी
पूर्व अमेरिकेतील झांझीबार बेटांवर २० डिसेंबर १९४८ रोजी अब्दुलरझाक यांचा जन्म झाला. त्यानंतर १९६८ मध्ये ते लंडनमध्ये निर्वासित म्हणून दाखल झाले. लंडन विद्यापीठाच्या ख्राइस्ट चर्च कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर केंट विद्यापीठात त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. १९८२ मध्ये डॉक्टरेट पूर्ण झाल्यावर नायजेरिया येथील ‘बायेरो’ विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. केंट विद्यापीठात इंग्रजी विभागाचे ते प्रमुख आहेत. आफ्रिकी देशांतील स्वातंत्र्योत्तर कालाचे लेखन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. कॅरेबियन बेटे, भारत येथील स्वातंत्र्योत्तर जगही त्यांनी अभ्यासले.
गाजलेल्या कादंबऱ्या
मेमरी ऑफ डीपार्चर (१९८७), पिलग्रिम वे (१९८८), पॅरेडाइज (१९९४), अॅडमायरिंग सायलेन्स (१९९६), बाय द सी (२००१), डेझर्टेशन (२००५), द लास्ट गिफ्ट (२०११), ग्रॅव्हल हर्ट (२०१७), अल्टरनेटिव्ह्ज (२०२०)
लघु कथा
माझी आई आफ्रिकेतील एका शेतात राहत होती (2006)
बक्षीस
२०२१ च्या नोबेल पारितोषिकाने गौरविलेले अब्दुलरझाक यांच्या १९९४ मधील ‘पॅरेडाइज’ ही कादंबरी ‘बुकर’ पारितोषिकाच्या शर्यतीत होती. ‘बाय द सी’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा ‘लॉस एंजलिस टाइम्स’चा पुरस्कार मिळाला.
या गोष्टींवर विशेष भाष्य
पूर्व आफ्रिकेतील स्थिती, आखाती देशातील स्थितीवर त्यांनी आपल्या साहित्यातून भाष्य केले. त्याशिवाय, वसाहतवादाचे आफ्रिका खंडावरील परिणाम, आफ्रिकेतील देशांच्या स्वातंत्र्यानंतर तेथील समाजजीवनावर झालेले परिणाम, वसाहतवाद आणि स्थलांतरामुळे होणारी फरपट आणि उद्ध्वस्त झालेले समाजजीवन याचाही वेध त्यांनी घेतला.
‘पॅराडाइज’मध्ये काय?
१९९४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘पॅराडाइज’मध्ये २० व्या शतकाच्या सुरुवातीला टांझानियामध्ये वाढलेल्या एका मुलाची कहाणी सांगितली आणि कादंबरीकार म्हणून गुरनाह यांनी नावलौकिक मिळवून बुकर पारितोषिक जिंकले. १९८६ मध्ये वोले सोयन्का यांच्या नंतर साहित्यामधील नोबेले पुरस्कार जिंकणारे गुरनाह हे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी लेखक आहेत. गेल्या वर्षीचा पुरस्कार अमेरिकन कवी लुईस ग्लुक यांनी जिंकला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times