हायलाइट्स:
- आणखी एका शेतकऱ्याने आयुष्य संपवलं
- पत्नी आणि दोन मुलं वाऱ्यावरून सोडून उचललं टोकाचं पाऊल
- कमवता व्यक्ति गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, जयचंद विश्वनाथ पंधरे वय ४४ वर्ष असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी जयचंद अनेक वर्षांपासून सततचे नापिक व वाढनारे कर्ज यांच्या चिंतेत होते. शेतात मोठ्या आशेने धानपिक लावले खरे. मात्र, त्यात पावसाचा मार आणि मावा तुडतूडा सारख्या रोगाने पिक नासण्याच्या स्थितित आले. आता कर्ज फेडायचे कसे ह्या चिंतेत असतांना अखेर त्यांनी आपल्या शेतात झाड़ाला गळफांस घेत आत्महत्या केली आहे.
घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सालेकसा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा करून अहवाल दाखल केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा असा छोटासा परिवार आहे. कमविता व्यक्ती गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times