हायलाइट्स:

  • प्रियकरासोबत उभ्या असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
  • माणसं की हैवान! प्रियकरासोबत तरुणी उभी असताना ४ जण आले आणि…
  • जे घडलं ते वाचून संतापाल

नागपूर : राज्यात कितीही जनजागृती केली, कितीही कठोर कायदे केले तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही. राज्यात रोज अनेक महिला अत्याचाराच्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. नागपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (Gang rape of a young woman standing with her boyfriend in Nagpur)

या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील माधव नागरी भागात ही घटना घडली आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या प्रियकरासोबत रस्त्यावर उभी होती. तिथे चार तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलीसोबत मुलालाही मारहाण केली. त्याला जखमी केलं आणि त्यानंतर पीडित मुलीला शेजारच्या शेतात नेलं आणि तिच्यावर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला.

आणखी एका शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, पत्नी आणि दोन मुलं वाऱ्यावरून सोडून उचललं टोकाचं पाऊल
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागपुरातच काय राज्यभरात महिला कुठेच सुरक्षित नाही आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. या तरुणीवर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आल्यामुळे पोलीस व्यवस्था ढिसाळ झाली आहे का? तरुणांमध्ये पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. पालकांनी या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भर रस्त्यात जर असे प्रकार घडत असतील तर यावर कठोर कारवाईची गरज आहे. (Gang rape of a young woman standing with her boyfriend in Nagpur)
ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा; तो नेता कोण? नवाब मलिक म्हणाले…

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here