हायलाइट्स:
- शरद पवारांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
- 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
- आयकरच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया
‘मलाही ईडीने नोटीस पाठवली होती. पण त्याचं काही झालं नाही. कारण नसतानाही ईडीची नोटीस पाठवली आहे. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला आजिबात नाही. हे सुडबुद्धीने राजकारण सुरू असल्याची’ टीका शरद पवारांनी केली आहे.
…अन्यथा स्वतंत्र लढू
यावेळी बोलताना, शरद पवार यांनी स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. जिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान होईल तिथेच आम्ही एकत्र अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सन्मान मिळाला नाही तर आम्ही स्वतंत्र लढवू असं वक्तव्य पवारांनी केलं आहे. इतकंच नाहीतर आगामी निवडणुकांसाठी महिलांनी आणि तरुणांनी तयार होण्याची गरज आहे. तरुण कार्यकर्त्यांना संधी देणं महत्त्वाचं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
– तरुण कार्यकर्त्यांना संधी द्या
– निवडणुकीसाठी महिलांनाही तयार व्हावं
– राष्ट्रवादीचा सन्मान झालाच पाहिजे अन्यथा सोलापूर मनपा निवडणूक स्वतंत्र लढू
– शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालून हत्याच केली
– शेतकर्याबद्दल भाजपला आस्थाच नाही
– भाजपच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक
– 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
– महाराष्ट्रात शांततेत बंद करायचा
– सोलापुरात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न राहील
– कारण नसतानाही ईडीची नोटीस पाठवली
– पाहुण्यांची चिंता आपल्याला आजिबात नाही
– आयकरच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया
– सुडबुद्धीने राजकारण सुरू असल्याची शरद पवारांची टीका
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times