टोकियो: जपानची राजधानी टोकियोमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. गुरुवारी रात्री आलेल्या या भूकंपामध्ये किमान ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भूंकपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. अनेकांनी मोकळ्या जागी धाव घेतली. भूकंपामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. भूकंपाचे केंद्र टोकियोच्या पूर्वेकडील चीबा प्रांतात असल्याचे वृत्त आहे.
सरकारी वृत्तवाहिनी एनएचके दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाच्या कारणामुळे शिनकानसेन सुपर एक्स्प्रेस ट्रेन काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. जपान सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times