मुंबई– छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ” ने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. अभिमन्यू जहागीरदार आणि लतिका यांच्यात हळुवार खुलणारं प्रेम पाहायला प्रेक्षकांनाही आवडतंय. परंतु, मालिकेत हेमा जहागीरदार हे पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं पाहायला मिळतंय. तिच्याजागी एक दुसरी कलाकार हे पात्र रंगवताना दिसतेय. यापूर्वी हेमाचं पात्र साकारणारी अभिनेत्री हिने एक पोस्ट करत तिच्या या निर्णयामागील कारण सांगितलं आहे.

प्रमितीने पोस्ट करत लिहिलं, ‘माझं आयुष्य काल वेगळं होतं आणि आज ते खूप वेगळं आहे. मी आता माझ्या जवळच्या प्रकल्पाचा भाग नाही सुंदरा मनामध्ये भरली. हे लिहिताना मला अश्रू अनावर झाले आहेत. पण शो पुढे गेलाच पाहिजे. मी त्यात असो किंवा नसो, माझं मन सुंदरासोबत नेहमीच असेल. सुंदरा मनामध्ये भरली सोबतचं हे वर्ष एक अद्भुत प्रवास आहे. मला त्यातील प्रत्येक सेकंदावर प्रेम होतं. सर्वांचे खूप आभार. मी आता माझ्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी थोडा वेळ घेईन. आपण हेमाला दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.’

प्रमितीच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन होत असल्याचं तिने सांगितलं. मेकअप केल्यामुळे हे इन्फेक्शन होत होतं. डॉक्टरांनी देखील प्रमितीला मेकअप न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे प्रमितीने काही काळ छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी प्रमितीने ‘तू माझा सांगाती’ आणि ‘गर्जा महाराष्ट्र’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रमिती एका मराठी चित्रपटातही झळकली आहे. प्रमिती तिच्या आरोग्यासाठी जरी मालिकेपासून दूर गेली असली तरी प्रेक्षक प्रमितीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here