ओस्लो: यंदाच्या वर्षाचा शांततेचा नोबेल पुरस्कार (नोबेल शांतता पुरस्कार 2021) जाहीर करण्यात आला आहे. यंदा दोन पत्रकारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला असल्याची घोषणा नोबेल पुरस्कार समितीने केली आहे. फिलीपाइन्सनमधील मारिया रेस्सा (Maria Ressa) आणि रशियातील दिमित्री मुरातोव्ह (Dmitry Muratov) या दोन पत्रकारांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.



नोबेल २०२१: साहित्यातील नोबेल विजेते अब्दुलरझाक गुरनाह आहेत तरी कोण?

या दोन्ही पत्रकारांनी आपल्या देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला. लोकशाही आणि शांततेची पूर्व अट असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे निवड समितीने म्हटले.

Explainer रेणू निर्माण करणाऱ्या यंत्राला का मिळाला यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार
मागील वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार हा संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला जाहीर करण्यात आला होता. युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले होते. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here