नवी दिल्लीः ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी पोलिसांची एकतर्फी कारवाई सुरू आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केलाय. तसंच सुप्रीम कोर्टाने याची दखल घेऊन न्यायालयीन मित्र नियुक्त करावा, अशी मागणीही काँग्रेसने केलीय. ईशान्य दिल्लीतील अजूनही तणावाचं वातावरण आहे. तिथल्या नागरिकांमध्ये भीती आहे, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला.

शासन-प्रशासनाचा वर्तन चिंताजनक

देशात आणि दिल्लीत अलिकडेच घडलेल्या घटनांमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. विरोध करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. असं असताना शासन-प्रशासनाचं वर्तन चिंताजनक आहे, असं आनंद शर्मा म्हणाले.

जाणूनबुजून कारवाईत दिरंगाई

देशद्रोह प्रकरणाचा दुरुपयोग होतो. दिल्ली हिंसाचार प्रकरणी सुरुवतीच्या काही दिवसांत कुठलीही कारवाई झाली नाही. उत्तरदायीत्व निश्चित झालं पाहिजे. आणि आता जी कारवाई होतेय तीही एकतर्फी आहे. सीएएविरोधात जे आंदोलनाला बसले होते त्यांच्याविरोधात कठोर कलमांतर्गत गुन्हे नोंदवले जात आहेत, असा आरोप आनंद शर्मांनी केला.

भाजप नेत्यांनी चिथावणीखोर भाषणं केली नाहीत, मग कुणी केलीत? सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा. या प्रकरणी कोर्टाने न्यायालयीन मित्र नियुक्त करावा जो सर्व प्रकरणं बघेल आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करेल, असं आनंद शर्मा म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here